Fashion’s Eternal Evolution: Where the Past Keeps Shaping the Future
Janhavi PhanshikarShare
आपण साधारणपणे सिरीयल मध्ये दिसणारे किंवा सिनेमांमध्ये दिसणारे fashion trends follow करतो.
बरेच designers जुन्या fashion कडे as a inspiration म्हणून बघतात. शिवाय social media चा पण खूप प्रभाव असतो एखादी style किंवा fashion trend मध्ये येण्यासाठी....असं म्हणतात की दर 20 वर्षांनी fashion आणि style repeat होते.
हे कसं होतं हे मी काही उदाहरणं देऊन सांगण्याचा प्रयत्न या लेखामध्ये केला आहे.
आपले जुने black and white movies होते तेव्हा रंग कुठले वापरले जातात हे आपल्याला कळत नव्हतं पण pattern मात्र दिसायचा. साडी वरती फुग्यांच्या बाह्यांचे ब्लाउज घातले आहेत किंवा साधे elblow sleeves चे घातले आहेत हे आपल्याला तेव्हा समजत होतं. तोच ट्रेंड आता परत आला आहे. आपण पैठण्या, नऊवारी साड्या, organza साड्या यांच्यावरती फुग्यांचे ब्लाउज prefer करतो. Elbow length blouse sleeves चा trend दोन-तीन वर्षांपूर्वीच परत आला आहे. त्याआधी होता short sleeved चा trend जो अजूनही आहे. पण काठापदराच्या साड्यांवरती सध्या elbow length blouse वापरला जातो. Organza साड्या असतील तर elbow puff blouse किंवा sleeves ना frill असणारे blouse चांगले वाटतात.
काही वर्षानंतर सिनेमा रंगीत झाला. त्यात तुम्ही बघितलं असेल साधना, आशा पारेख, सायरा बानू यांचे कपडे एकदम tight fit कुर्तीज आणि चुडीदार हे असायचे. आत्ता आपल्याकडे चुडीदार च्या ऐवजी लेगिन्सचा trend आला आहे. कुर्ती तर हा आपला fashion मधला अविभाज्य भाग आहे. मग ती तुम्ही casual ला वापरा, formal ला वापरा नाहीतर festivel ला वापरा, सगळ्या occasions ला kurti comfortable आणि easy going असते. फक्त त्याचं fabric texture, print आणि pattern त्या त्या occasion प्रमाणे बदलतात. Leggings हे चुडीदार चं advance version आहे. चुडीदार ला पायाच्या घोट्याच्या इथे चुण्या पडायच्या आणि कुर्ती एकदम टाईट फिट असायची. Leggings ला पण घोट्याच्या इथे चुण्या पडतात. पण Leggings sretchable असते आणि जास्त comfortable असते. Leggins मध्ये आपण जास्त easily movements करू शकतो.अशा प्रकारे चुडीदार चा trend हा leggings च्या रूपात परत आलेला आहे.
आपली आई किंवा आजी साडीच्याच रंगाचे ब्लाउज वापरायचे. त्यावेळी contrast blouse प्रकार प्रचलित नव्हता. Mismatched fashion नव्हती. साडी मधला running blouse piece नाहीतर साडी मधल्या काठातला किंवा पदरातला एखादा रंग घेऊन टू बाय टू चा ब्लाउज शिवला जायचा. पण आता हाच प्रकार नाव बदलून co ord set या नावाने परत आलेला आहे. Contrast blouse ची fashion अजूनही आहे. मध्यंतरी जान्हवी कपूरची एक sequence work ची साडी एकदम hit झाली होती. त्या साडीबरोबर तिने सेम fabric चा sleeveless blouse pair केला होता. हा एक प्रकारचा co ord set च झाला ना. शिवाय आत्ता co ord sets अनेक प्रकारच्या style मध्ये वापरले जातात.
त्यानंतर आपण वळूया one piece dress कडे. पूर्वी हेच one piece dress हे maxi dress or midi dress नावाने trend मध्ये होते. Center ला elastic टाकलं की झाला maxi dress. तो trend आता one piece dress या नावाने पुन्हा in झालेला आहे. आता त्यात अनेक styles add झाल्यात जसं की knee length, layered, calf length, full length, halter neck, spaghetti, off shoulder वगैरे. पण मूळ साचा हा maxi dress चाच आहे.
अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर पूर्वी bell bottoms होते. नीतू सिंग, zeenat aman, hema malini यांच्या सिनेमांमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आता हा हेच bell bottom हे pallazo या नावाने पुन्हा trend मध्ये आलेले आहेत. Pallazo मध्ये सध्या comfort level प्रमाणे तीन प्रकार केलेत. एक straight fit pallazo, दुसरी wide pallazo आणि तिसरी elephant pallazo. Bell bottom हा elephant pallazo च्या जवळ जाणारा प्रकार आहे.
पूर्वी स्कर्टब्लाऊज या नावाने एक fashion trend मध्ये होती. आता skirt top किंवा skirt आणि crop top अशी fashion आता trend मध्ये आहे. पूर्वी Bobby Cinema मध्ये Dimple ने घातलेला polka dot चा top आणि short skirt खूप hit झाला होता. आताही skirts वेगवेगळ्या length प्रमाणे styling करून वापरले जातात. Polka dot चा विषय आलाच आहे तर हे print पण आता trend मध्ये आणि बरं का..Crop tops, kids wear, scarves मध्ये हे print सध्या खूप वापरलं जातय.
Same आपण खण fabrics बद्दल म्हणू शकतो. खणाच्या साड्या, blouses, skirts,kids wear, Kurtis, dupatte नी मध्ये धुमाकूळ घातला होता. तसच इरकल साडी, temple border साड्या , checks चे प्रकार अशा खूप गोष्टी पुन्हा पुन्हा trend मध्ये येत असतात.
So to conclude fashion is ever evolving industry that continuously recycles trends from past.
Thank you