Exploring the Magic of Color in Design

Exploring the Magic of Color in Design

Janhavi Phanshikar

ताग्यामधलं कापड असो, साडी असो, रेडीमेड असो,  किंवा unstitched materials, colour combinations ला खूप महत्त्व असतं. साडी आणि blouse चं colour combination, साडी आणि काठांच combination, साडीवरचे design किंवा बुट्टे.  तसंच stitched आणि unstitched dresses मध्ये top-bottom-dupatta  combination.....ही सगळी combinations आली कुठून? तर यामध्ये सर्वात जास्त inspiration असतं ते आपल्या  भोवतालचा निसर्ग......🌸🌱🌿🪴🌲🌅🌈🦜🦚🍉🥭💧

निसर्गामध्ये तुम्हाला एकाच रंगाच्या खूप छटा दिसतात.
एक पिवळा रंग जरी घेतला तरी त्याच्यामध्ये झेंडूच्या फुलांचा पिवळा रंग, बहावाचा पिवळा रंग, गुलाबाचा वेगळा, जास्वंदीचा वेगळा, आंब्याचा पिवळा रंग वेगळा तर लिंबाच्या पिवळा रंग वेगळा, हळद्या पक्ष्याचा रंग वेगळाच. आणि या रंगांना analogue रंग किंवा contrast रंग पण निसर्गातच मिळतात.
निसर्गात म्हणजे काय तर पानं,फुल,फळं,समुद्र, डोंगर,  सूर्यास्त, प्राणी, पक्षी, कीटक यांना निसर्गाने जे रंग बहाल केले आहेत तेच आपल्याला clothing, interiors आणि जिथे रंगांचा वापर होतो तिथे दिसतात. सगळ्यात महत्त्वाचा आणि विलोभनीय निसर्गाचा आविष्कार म्हणजे इंद्रधनुष्य. 🌈🌈🌈

सूर्यास्ताच्या वेळी आकाशात दिसणारे peach, orange, grey , क्वचित violet हे combination. 

समुद्राचा blue, turquoise आणि sea green colour. आणि वाळूचा पांढरा किंवा beige colour. 

पैठण्यांवरती तर अख्खे पक्षीच विराजमान झाले आहेत. मोर, पोपटी, मुनिया वगैरे. तर Quirky prints मध्ये Penguins, हत्ती, घुबड, ससे, उंट दिसतात. फुलांचे आणि पानांचे print असलेले fabrics तर अमाप आहेत. 

नैसर्गिक रंगांचा सगळ्यात जास्त वापर होतो hand block print fabrics मध्ये.  याच्यामध्ये रंग खऱ्या फुलांपानांपासून बनवलेले असतात. त्यामुळे हे धुताना त्या कापडाचा रंग जात राहतो. आपल्याला वाटतं कापड चांगल्या quality चं नाहीये. तर असं नसून ते pure hand block print असतं. इंडिगो, दाबू, बागरू, कलमकारी  ह्या fabrics मध्ये नैसर्गिक रंगांचा वापर असतो. 

Sir Newtown यांनी light आणि prism चा प्रयोग करताना Colour wheel introduce केलं. Primary colours, secondary colours आणि tertiary colours हे त्यानंतर आले.  त्यानंतर colour schemes, colour theory, monochromatic colours हे concept हळूहळू येत गेले. 

Colour effects on human psychology हा अजून एक concept आला. आणि याचा वापर marketing आणि branding मध्ये सगळ्यात जास्त होतो. 

कोणत्या occasion साठी कोणता रंग आणि fabric हा पुन्हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. पण रंगाबद्दलचा हा लेख कसा वाटला ते नक्की सांगा.

Thank you

Back to blog